सेल्फी काढताना पाय घसरला, माची प्रबळगडावरून खाली पडल्याने 24 वर्षीय महिलेचा मृत्यू

 

सेल्फी काढताना पाय घसरला, माची प्रबळगडावरून खाली पडल्याने 24 वर्षीय महिलेचा मृत्यू 
नवीन पनवेल : सेल्फी काढताना पाय घसरल्याने माची प्रबळगडावरून खाली पडल्याने 24 वर्षीय नवविवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना 28 डिसेंबर रोजी घडली आहे. शुभांगी विनायक पटेल (दत्तवाडी, पुणे ) असे मृत महिलेचे नाव आहे. दोघे पती-पत्नी ट्रेकिंग करता गेलेले असताना सेल्फी काढताना पाय घसरून ती खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला. शुभांगी आणि विनायक यांचे 8 डिसेंबर 2023 रोजी वीस दिवसापूर्वी लग्न झाले होते. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.





 पनवेल- शुभांगी आणि तिचा पती विनायक पटेल हे दोघे लोणावळा येथे हनिमून साठी 28 डिसेंबर रोजी गेले होते. त्या ठिकाणाहून ते दुपारी 2 च्या सुमारास माची प्रबळ येथे ट्रेकिंग साठी गेले. ते वर चढले. यावेळी शुभांगी सेल्फी काढत असताना तिचा पाय घसरला आणि ती वरून खाली पडली. हा सर्व प्रकार विनायक याच्या डोळ्यादेखत घडला. शुभांगी अंदाजे दीड ते दोन हजार फूट खाली कोसळली असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. महिला खाली पडल्याचे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनी अनिल पाटील याना समजताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेडुंग  चौकीचे पोलीस अंमलदार गोपीनाथ पठारे, अमर भालसिंग तसेच एपीआय अर्चना कुदळे, एपीआय सचिन पोवार, पीएसआय हर्षल रजपूत, सोनकांबळे घटनास्थळी गेले. यावेळी तालुका पोलिसांच्या, स्थानिकांच्या आणि निसर्ग मित्र यांच्या मदतीने या महिलेला बाहेर काढण्यात आले. यावेळी फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले होते. तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी रात्री आठच्या सुमारास मृत घोषित केले.
     माची प्रबळगडावर ट्रेकिंगला गेलेल्या अनेकांचा यापूर्वी देखील खाली पडून मृत्यू झालेला आहे. तरी देखील नागरिक या ठिकाणी ट्रेकिंग साठी येतात. कसलाही अनुभव नसताना या ठिकाणी ट्रेकिंग करतात व पाय घसरून खाली पडतात व त्यात त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी ट्रेकिंगला जाऊ नये असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.


पिस्तूल शूटर गौरव जगदीश ठाकुर याची मुंबई युनिव्हर्सिटी झोनल मधून निवड
नवीन पनवेल : कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटी हरियाणा येथे होणाऱ्या साऊथ वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी एअर रायफल व पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिप 2023-24 साठी "वीर वाजेकर महाविद्यालय" फुंडे  उरण येथील विद्यार्थी पिस्तूल शूटर गौरव जगदीश ठाकुर (राहणार चिरनेर,उरण) याची  मुंबई युनिव्हर्सिटी झोनल मधून निवड झाली आहे.
        3 जानेवारी व 8 जानेवारी 2024 कुरुक्षेत्र  युनिव्हर्सिटी हरियाणा राज्य येथे होणाऱ्या इंटर युनिव्हर्सिटी साउथ वेस्ट झोनमधून गौरव जगदीश ठाकुर याची निवड झाली. त्याने मुंबई येथे झालेल्या सिटीझोनल मधून वैयक्तिक ब्रांझ पदक तसेच अंबरनाथ येथे झालेल्या इंटर झोनल वैयक्तिक ब्रांझ व सांघिक गोल्ड मेडल मिळवून कामगिरी केली आहे. सिद्धांत रायफल अँड पिस्तूल शूटिंग क्लब रायगड व इंडियन मॉडेल स्कूल व ज्युनियर कॉलेज उलवा येथील शूटिंग रेंजवर नेमबाजीचे प्रशिक्षण राष्ट्रीय नेमबाज रायगड भूषण किशन खारके व अलंकार कोळी यांच्यामार्फत घेत आहे. त्याच्या या निवडी बद्दल वीर वाजेकर महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिमानाची गोष्ट आहे की साऊथ वेस्ट इंटर युनिव्हर्सिटी मधून खेळणारा रायगड जिल्हा व नवी मुंबई येथील पहिलाच पिस्तूल शूटर नेमबाज आहे.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image