झाडांना खिळे ठोकणे व विद्रुपीकरणास प्रतिबंध करणेबाबत जाहीर प्रकटन
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. काही व्यावसायिक हे त्यांच्या व्यवसायाची जाहिरात व्हावी या हेतूने मुख्यत्वे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना खिळे ठोकून जाहिराती लावतात. भित्तीपत्रके, स्टिकरव्दारे जाहिरात चिकटवतात. यामुळे झाडांना इजा पोहचते व शहराच्या सौदर्यास बाधा पोहोचून विद्रुपीकरण होते.
त्यामुळे झाडावरील पोस्टर्स / भित्तीपत्रके व जाहिराती इ. साहित्य तसेच झाडावर खिळे लावून जाहिरात लावली असल्यास हे जाहीर आवाहन प्रसिध्द झाल्यापासून तीन (3) दिवसांचे आत ते काढून घ्यावे असे आवाहन उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने करण्यात येत आहे.
या कालावधीनंतर जाहिराती आढळून आल्यास, तसेच यापुढे झाडांना खिळे ठोकून जाहीरात लावल्यास किंवा पोस्टर, भित्तीपत्रके व जाहिराती लावणा-यांवर / संबंधितांवर महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम 1995 अन्वये नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे.