बाळाराम पाटील, जे.एम.म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन

 बाळाराम पाटील, जे.एम.म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन



पनवेल : 

तालुक्यातील नावडे येथील परशुराम जोमा म्हात्रे विद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन मा.आ.बाळाराम पाटील आणि पनवेल नगरीचे माजी आदर्श नगराध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक जे.एम.म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांनी सुबक रांगोळ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीचे औचित्य साधून नावडे येथील परशुराम जोमा म्हात्रे विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन तसेच स्पर्धा परीक्षा केंद्राचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी सुबक आणि रेखीव रांगोळ्यांची कलाकृती करीत उपस्थितांची मने जिंकली. तसेच यावेळी मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांनी ढोल, ताशा आणि लेझिम नृत्य करून केले. या स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह पनवेल नगरीचे माजी आदर्श नगराध्यक्ष जे.एम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी संस्थेचे सहसचिव श्री.पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत, शाळा समिती चेअरमन एकनाथ पाटील, प्राचार्या सौ. व्ही.बी. मोहिते, विशाल म्हात्रे आदींसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.