महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्यावतीने सेंट जोसेफ शाळेमध्ये पोस्टर स्पर्धा


महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्यावतीने सेंट जोसेफ शाळेमध्ये पोस्टर स्पर्धा


पनवेल,दि.18 : आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. आज दिनांक  18 ऑक्टोबर रोजी  नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ स्कूल मध्ये माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत पर्यावरणपूरक सण साजरे करण्याच्या पार्श्वभूमीवरती पोस्टर मेकिंग स्पर्धा घेण्यात आली.

 महापालिकेच्यावतीने पर्यावरणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्याच्यादृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.  याचाच एक भाग म्हणून उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या सूचनेप्रमाणे पर्यावरणपूरक सणांचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे यादृष्टीकोनातून  नवीन पनवेल मधील सेंट जोसेफ स्कूलमध्ये फटाके बंदी व पर्यावरणपूरक  दिवाळी ह्या विषयावरती पोस्टर मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. 

इयत्ता 5 वी ते 7 वी  आणि 8 वी ते 10 अशा दोन गटात झालेल्या यास्पर्धेत सुमारे 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. यानंतर पालिका क्षेत्रातील आणखीन चार शाळेमध्ये पर्यावरणविषयक स्पर्धा घेण्यात येणार आहे.

यास्पर्धेसाठी पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण ,विद्यालयाचे मुख्याध्यापक फरझाना तुंगेकर आणि चित्रकला विषयाचे शिक्षक  सचिन काटकर यांचे सहकार्य लाभले.

Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image