सिडको अधिकारी व कर्मचारी यांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा सिडको भवन येथे संपन्न

 सिडको अधिकारी व कर्मचारी यांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा सिडको भवन येथे संपन्न 


सिडकोमध्ये दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी सिडको अधिकारी व कर्मचारी यांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी सिडको महामंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला. सदर कार्यक्रम सन १९८२ पासून प्रतिवर्षी आयोजित केला जातो. 


या प्रसंगी श्री. अनिल डिग्गिकर, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, श्री. राजेश पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक - १, श्री. शांतनू गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक-२, श्री. सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी, श्री. फैयाज खान, व्यवस्थापक (कार्मिक) व श्री. विनोद पाटील, अध्यक्ष, सिडको कर्मचारी संघटना यांसह सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. 


कोणत्याही क्षेत्रात शिक्षण घेताना त्यातील यश – अपयश निश्चित नसते, परंतु तुम्ही घेत असलेल्या शिक्षणामुळे तुमचे व्यक्तिमत्व विकसित होण्यास निश्चितच मदत होते. शिक्षण क्षेत्रातील उपलब्ध विविध संधींचा लाभ घेऊन देशाच्या निर्मितीत आपले योगदान द्यावे, असा संदेश श्री. अनिल डिग्गिकर यांनी दिला.


या प्रसंगी इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या ४२ तर इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या ३० अशा एकूण ७२ विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.