सातव्या विसर्जनदिनीही कृत्रिम तलावांना उत्तम प्रतिसाद देत एकूण 2894 श्रीगणेशमूर्तींचे भक्तीमय विसर्जन
-श्रीगणेशोत्सवातील सातव्या विसर्जनदिनीही कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनाला पसंती देत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आठही विभागात 2715 घरगुती व 179 सार्वजनिक अशा एकूण 2894 श्रीमूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन संपन्न झाले. यामध्ये 22 पारंपारिक मुख्य विसर्जनस्थळांवर 2284 श्रीगणेशमूर्तींचे व 141 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 610 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
यामध्ये, मुख्य 22 विसर्जन स्थळांमधील -
बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 271 घरगुती व 13 सार्
नेरूळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 354 घरगुती व 36 सार्वजनिक मंडळांच्या श्रीगणेशमूर्ती,
वाशी विभागात 2 विसर्जन स्थळांवर 144 घरगुती व 10 सार्वजनिक मंडळांच्या श्रीगणेशमूर्ती,
तुर्भे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 320 घरगुती व 27 सार्
कोपरखैरणे विभागात 2 विसर्जनस्थळांवर 400
घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 457 घरगुती व 39 सार्वजनिक मंडळांच्या श्रीगणेशमूर्ती,
ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 164 घरगुती व 17 सार्वजनिक मंडळांच्या श्रीगणेशमूर्ती,
अशाप्रकारे एकूण 21 विसर्जन स्थळांवर 2110 घरगुती व 174 सार्वजनिक अशा एकूण 2284 श्री गणेश मुर्तींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले. विशेष म्हणजे दिघा विभागात सर्व श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम विसर्जन तलावांत करण्यास नागरिकांनी पसंती दिली.
त्याचप्रमाणे, सातव्या विसर्जन दिवशीही कृत्रिम विसर्जन तलावांना पसंती देत 141 कृत्रिम विसर्जन स्थळांवर,
बेलापूर विभागात – 19 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 22 घरगुती व 2 सार्
नेरूळ विभागात – 26 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 82 घरगुती व 1 सार्वजनिक मंडळाची
वाशी विभागात – 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 52 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
तुर्भे विभागात – 17 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 170 घरगुती व 2 सार्वजनिक मंडळांच्या श्रीगणेशमूर्ती,
कोपरखैरणे विभागात – 15 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 113 घरगुती श्रीगणेशमूर्ती,
घणसोली विभागात - 21 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 40 घरगुती श्रीगणेशमू
ऐरोली विभागात – 18 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 103 घरगुती श्रीगणेशमू
दिघा विभागात – 9 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 23 घरगुती व श्रीगणे
अशाप्रकारे एकूण 141 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 605 घरगुती व 5 सार्वजनिक अशा एकूण 610 श्रीगणेशमुर्तींचे भक्तीमय निरोप देत विसर्जन करण्यात आले.
दिघा विभागामध्ये पारंपारिक मुख्य विसर्जन स्थळावर एकही श्रीमूर्ती विसर्जन न करता,नागरिकांनी घराजवळच्या कृत्रिम विसर्जन तलावांना पसंती देत महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला.
सर्व विसर्जन स्थळांवर विभाग कार्यालयाच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी यांचेसह स्वयंसेवकांची आणि मुख्य विसर्जन स्थळांवर लाईफ गार्ड्सची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासोबतीने अग्निशमन विभाग तसेच आरोग्य विभागाचीही पथके तयार होती. सर्व मुख्य ठिकाणी नवी मुंबई पोलीस दक्षतेने कार्यरत होते. दीड व पाच दिवसांप्रमाणेच सातव्या दिवशीचा विसर्जन सोहळाही भक्तीमय वातावरणात शांततेने पार पडला.
विसर्जनस्थळी भाविकांनी जलाशयामध्ये निर्माल्य न टाकता त्याठिकाण ओले व सुके निर्माल्य टाकण्यासाठी ठेवलेल्या स्वतंत्र निर्माल्य कलशात ते टाकावे असे आवाहन करण्यात आले होते. त्याला स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. सर्व विसर्जन स्थळांवरून सातव्या दिवसाच्या विसर्जनदिनी 3 टन 915 किलो निर्माल्य संकलित झालेले आहे. अशाप्रकारे यावर्षीच्या गणेशोत्सव 2023 मध्ये 3 विसर्जन दिवसात 48 टन 500 किलो इतके निर्माल्य जमा झाले असून ते स्वतंत्र निर्माल्य संकलन वाहनांव्दारे प्रकल्पस्थळी नेण्यात आले आहे. त्याठिकाणी निर्माल्याचे यथोचित पावित्र्य राखून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे.
आता अनंतचतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणावर होणा-या विसर्जन सोहळ्याकरिता तसेच सार्वजनिक मंडळांच्या आकाराने मोठ्या मूर्तींची व गर्दीची शक्यता लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिकेने अधिक चोख सर्वोतोपरी नियोजन केले असून नागरिकांनी नेहमीप्रमाणे संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.