नमुंमपा मुख्यालयात आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न मुख्यालयाच्या तिरंगी रंगातील आकर्षक रोषणाईसोबत सेल्फीचे नागरिकांमध्ये आकर्षण


                                          

 

नमुंमपा मुख्यालयात आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न

मुख्यालयाच्या तिरंगी रंगातील आकर्षक रोषणाईसोबत सेल्फीचे नागरिकांमध्ये आकर्षण






नवी मुंबई-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता 30 ऑगस्ट रोजी होत असून यावर्षीचा स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवात साजरा होणारा असल्याचे महत्व लक्षात घेत आयकॉनिक वास्तू म्हणून नावलौकिक असणा-या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या प्रांगणात आज भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्त  महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ यांचेसह विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारीवृंदाप्रमाणेच नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यालय इमारतीला केलेल्या नयनरम्य तिरंगी विद्युत रोषणाईमुळे भव्यतम मुख्यालय इमारतीच्या आकर्षणात भर पडलेली असून नागरिक मित्र, परिवारासह एकत्र येऊन तिरंगी झळाळी असलेल्या मुख्यालय वास्तुसोबत तसेच आतमध्ये ठेवलेल्या सेल्फी पॉईंटवर उत्साहाने छायाचित्रे काढताना दिसत आहेत. 16 ऑगस्टपर्यंत ही रोषणाई बघता येणार आहे.

याशिवाय पावसाळी कालावधीत फडकविला न जाणारा मुख्यालय इमारतीसमोरील उंच व भव्यतम स्वरूपातील प्रतिकात्मक राष्ट्रध्वज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून घरोघरी तिरंगा मोहीमेच्या अनुषंगाने फडकविण्यात आला असून हे देखील नागरिकांचे विलक्षण आकर्षण आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने या परिसराला भेट देत राष्ट्रप्रेम जागवित आहेत.