रिक्षाचालकांनी प्रवाश्यांशी सौजन्याने वागावे व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे - वपोनि नितीन ठाकरे

रिक्षाचालकांनी प्रवाश्यांशी सौजन्याने वागावे व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे - वपोनि नितीन ठाकरे


पनवेल दि.०४ (संजय कदम) : रिक्षा चालकांनी आपला व्यवसाय करताना प्रवाश्यांशी सौजन्याने वागावे, योग्य ते भाडे घ्यावे, एकट्या माता-भगिनींना सुद्धा त्यांच्या इच्छितस्थळी सोडावे व वाहतुकीचे नियम पाळावे असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पनवेल रेल्वे स्टेशन येथील रिक्षा स्टँडवर रिक्षा चालकांसोबतच्या बैठकीत केले. 

              पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पनवेल रेल्वे स्टेशन येथील रिक्षा स्टँडवर रिक्षा चालकांची बैठक घेण्यात आली. यावेळी वपोनि नितीन ठाकरे यांनी रिक्षाचालकांना मार्गदर्शन करून कोणतीही बेवारस वस्तू किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलीस ठाण्याची संपर्क साधावा अश्या सूचना केल्या. यावेळी गोपनीय विभागाचे अधिकारी संजय धारेराव यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी व रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Popular posts
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image