पनवेल मनपाचे माजी विरोधी पक्षेनेते प्रीतम म्हात्रे यानी इर्शाळवाडी येथील दुर्घटना ग्रस्त भागाची केली पाहणी
पनवेल मनपाचे माजी विरोधी पक्षेनेते प्रीतम म्हात्रे यानी इर्शाळवाडी येथील दुर्घटना ग्रस्त भागाची केली पाहणी
• Appasaheb Magar
पनवेल मनपाचे माजी विरोधी पक्षेनेते प्रीतम म्हात्रे यानी इर्शाळवाडी येथील दुर्घटना ग्रस्त भागाची केली पाहणी
खालापूर तालुक्यातील चौक इरशाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून एकूण २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत.अंधार आणि पाऊसही असल्याने बचावकार्यात प्रचंड अडथळे येत आहेत शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदत कार्यात सक्रिय आहेत. जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून प्रशासनाला मदतकार्यात आवश्यक मदत करीत आहे. मदतकार्य करणारे एन.डी.आर.एफ टीम, पोलीस बांधवांना तसेच सामाजिक सेवकांना श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नढाळ येथे अन्नसेवा आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मदत कार्य करणाऱ्या सेवकांना कुठलीही मदतीची आवश्यकता असेल तर त्यांनी 8334050505, 8796639665 क्रमांकावर संपर्क साधावे असे आवाहन माजी विरोधी पक्षेनेते प्रीतम म्हात्रे यानी केले आहे.