पार्किंग धोरणाच्या अनुषंगाने गतीमान कार्यवाही करण्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे निर्देश


                                                              

 

पार्किंग धोरणाच्या अनुषंगाने गतीमान कार्यवाही करण्याचे आयुक्त श्रीराजेश नार्वेकर यांचे निर्देश




 

नवी मुंबई (प्रतिनिधी)-नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सुनियोजित पार्किंग व्यवस्थापनाकडे नमुंमपा आयुक्त श्रीराजेश नार्वेकर यांचे बारकाईने लक्ष असून याबाबत सातत्याने आढावा बैठकांद्वारे पार्किंग पॉलिसी नियोजनाला गतिमानता दिली जात आहे.

      याविषयी आज झालेल्या विशेष बैठकीत आयुक्त श्रीराजेश नार्वेकर यांनी शहरातील पार्किंग विषयक नियोजन कार्यवाहीच्या पहिल्या टप्प्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने वाहतूक पोलीस विभागासमवेत केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील वाहनांची संख्या आणि पार्किंगच्या जागा यांच्या उपलब्ध माहितीचा अभ्यास करून उपाययोजना सुचवून त्याची अंमलबजावणी करण्यावर भर देण्याचे निर्देश दिलेपार्किंग नियोजनाविषयी शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म अशा दोन पातळ्यांवर काम करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केलेशॉर्ट टर्ममध्ये सध्या उपलब्ध सुविधांच्या अनुषंगाने सुनियोजित पार्किंग उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असून लाँग टर्ममध्ये भविष्याचा वेध घेऊन शहरासाठी पार्किंगच्या आवश्यक सोयी-सुविधांची उपलब्धता करून देण्याचे आयुक्तांचे नियोजन आहे.

      या बैठकीस शहर अभियंता श्री संजय देसाईउद्यान विभागाचे उपायुक्त श्री दीपक नेरकरउपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती हेमांगी पाटीलअतिरिक्त शहर अभियंता श्रीशिरीष आरदवाडवाहतूक पोलीस सहा.आयुक्त श्रीसुनील बोंडेकार्यकारी अभियंता श्रीमशुभांगी दोडेइस्टेट मॅनेजर श्रीअशोक अहिरे उपस्थित होते.

      नवी मुंबई सारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये नागरिकांचा आर्थिक स्तरही उंचावल्यामुळे वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेएकीकडे सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याची भूमिका जपण्यासोबत उपलब्ध पार्किंग जागांचा विकास करण्याकडेही लक्ष दिले जात आहे.

      याविषयी नवी मुंबई महानगरपालिकावाहतूक पोलीस विभाग व प्रादेशिक परिवहन विभाग या तिन्ही विभागांच्या समन्वयाने नवी मुंबईतील पार्किंग धोरणाला आकार मिळावा ही भूमिका नजरेसमोर ठेवून आयुक्त श्रीराजेश नार्वेकर यांच्या वतीने वारंवार आढावा बैठकांचे आयोजन करून गतिमान पावले उचलली जात आहेत.

      पार्किंग पॉलिसीची प्रभावी अंमलबजावणी करताना स्थळनिहाय सर्वेक्षण करून तेथील आवश्यकता तपासण्याची गरज असल्याचे लक्षात घेत शहर नियोजनातील पार्किंगचे महत्वआर्थिकदृष्ट्या लाभदायित्व तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे पार्किंग नियोजनाची उत्तम अंमलबजावणी अशा विविध बाबींचा सांगोपांग विचार या बैठकीत करण्यात आला.

      शहरातील सध्याची पार्किंगची स्थिती लक्षात घेऊन अभियांत्रिकी व वाहतूक पोलीस विभागाने केलेल्या पाहणी अहवालाचा साकल्याने विचार करून उपाययोजना सूचवाव्यात असे सूचित करीत याबाबतची कार्यवाही तत्परतेने करावी असे महापालिका आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांनी निर्देश दिले.

 

Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image