कोकण शिक्षक मतदारसंघात भाजप महायुतीच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय

अखेर शिक्षकांचा आमदार शिक्षक झाला 

कोकण शिक्षक मतदारसंघात भाजप 

हायुतीच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय

शेकापच्या बाळाराम पाटलांचा दारुण 

पराभव

  


पनवेल

(हरेश साठेविधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजप

शिवसेनारिपाइंशिक्षक परिषद  मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकाप आघाडीचे बाळाराम पाटील यांचा दारुण पराभव केला आहेत्यामुळे शेकापसह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

       या निवडणुकीत ९१ टक्के मतदान झाले होतेमतदान झालेल्या एकूण ३५हजार ६९ मतांपैकी ३३ हजार ४५० मते वैधतर १६१९ मते अवैध ठरलीमतमोजणीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पहिल्या पसंतीची तब्बल २० हजार ६८३ मते मिळवून दणदणीत विजय मिळविला तर पराभूत शेकापच्या बाळाराम पाटील यांना केवळ १० हजार ९९७ मतांवर समाधान मानावे लागले.

ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाया विजयावर प्रतिक्रिया देताना म्हात्रे यांनीहा विजय माझा एकट्याचा नसून मतदारसंघातील संपूर्ण शिक्षकांचा आहेगेल्या सहा वर्षांत मी जे काम केले त्याची पोचपावती आज कोकण विभागातील शिक्षकांनी दिली आहे३३ संघटनांचा आम्हाला पाठिंबा होता तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय मंत्रीराज्यातील मंत्री तसेच या मतदार संघातील आमदार आणि शिक्षक सहकाऱ्यांनी मेहनत घेतलीत्यांचा विश्वास सार्थ ठरवून शिक्षकांसाठी सातत्याने काम करीत राहणार असल्याची ग्वाहीम्हात्रे सर यांनी दिलीदरम्यानया विजयाबद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूरभाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूरआमदार महेश बालदी यांनी नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


कोट-शिक्षकांनी आपल्यापैकी एक असलेल्या शिक्षकालाच विजयी केले. अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे हा विजय सोपा झाला. नामदार रविंद्र चव्हाण 

कोट शेकापचे बाळाराम पाटील ज्या शिक्षकांच्या पाठिंब्यावर निवडून आले त्या शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावू शकले नाहीतत्यामुळे त्यांचा पराभव झाला तर शिक्षकांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले ज्ञानेश्वर म्हात्रे सर हे मुळातच शिक्षक असल्याने ते निवडून आले पाहिजे हि भावना शिक्षकांची होतीआणि त्याचा परिपाक म्हणून ३५ वर्षांमध्ये पहिल्यांदाच पहिल्या फेरीत भरघोस मतांनी निवडून आले आहेतमी तत्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतोआमदार प्रशांत ठाकूरअध्यक्षभाजप-रायगड जिल्हा 


 कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक 
एकूण मतदान - ३५०६९ 
➡️ वैध मते ३३४५०
➡️  अवैध मते - १६१९
➡️ कोटा - १६७२६

➡️  ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे - २०६८३
➡️ धनाजी नानासाहेब पाटील - १४९०
➡️ उस्मान इब्राहिम रोहेकर - ७५
➡️ तुषार वसंतराव भालेराव - ९०
➡️ रमेश नामदेव देवरुखकर - ३६
➡️ बाळाराम दत्तात्रेय पाटील - १०९९७
➡️ राजेश संभाजी सोनवणे - ६३
➡️ संतोष मोतीराम डामसे -  १६


 

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image