06 मार्च रोजी नवी मुंबई महानगरपालिका लोकशाही दिन


                                                                                                               06 मार्च रोजी नवी मुंबई महानगरपालिका लोकशाही दिन




नवी मुंबई-महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.

माहे मार्च महिन्याचा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी दि. 06 मार्च 2023 रोजी होणार असून निवेदनकर्त्यांनी आपला अर्ज विहित नमुन्यात दोन प्रतीं मध्ये दि.20 फेब्रुवारी 2023 पर्यंत माआयुक्तनवी मुंबई महानगरपालिका यांचे नावे 'लोकशाही दिनाकरीता अर्जअसे अर्जाच्या वरील दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचा आहे.

सदर अर्जात नमूद तक्रार निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असावेअर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावाअर्जादाराने संबंधित विषयाबाबत या आधी विभाग कार्यालयविभागप्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे. याशिवाय लोकशाही दिनामध्ये – न्यायप्रविष्ट प्रकरणेराजस्व अपिलसेवा विषयक – आस्थापना विषयकबाबी या बाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावीत्याचप्रमाणे विहित नमुन्यात नसणारे व अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीततसेच तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर तसेच यापूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे.

लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमुना नागरिकांसाठी महानगरपालिका नूतन मुख्यालय इमारतजनसंपर्क विभागतिसरा मजलासे. 15 किल्लेगांवठाण जवळसी.बी.डी., बेलापूर येथे विनामूल्य उपलब्ध असून नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ (Website) www.nmmc.gov.in यावरील डाऊनलोड आयकॉनवरून अर्ज नमुना प्रत सहजपणे डाऊनलोड करुन घेता येऊ शकते याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे


Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image