नवी मुंबई महानगरपालिका- साहसी जलतरण क्षेत्रातील मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल शुभम वनमाळी यांचा विशेष सन्मान

 नवी मुंबई महानगरपालिका-

 

साहसी जलतरण क्षेत्रातील मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल शुभम वनमाळी यांचा विशेष सन्मान



अर्जुन पुरस्कारासारखा मानाचा समजला जाणारा साहसी खेळामधील ‘तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार (Tenzing Norgay National Adventure Award)’ नुकताच नेरूळ मधील साहसी जलतरणपटू शुभम धनंजय वनमाळी यांस महामहीम राष्ट्रपती महोदयांच्या शुभहस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला असून यामुळे नवी मुंबईचा नावलौकिकात देश पातळीवर क्रीडा क्षेत्रात उंचावलेला आहे.

शुभम वनमाळी यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच त्यांस प्राप्त झालेल्या साहसी खेळामधील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या सन्माननीय उपस्थितीत त्यांचा शाल, सन्मानचिन्ह आणि ग्रंथभेट प्रदान करून गौरव करण्यात आला.

सन 2018 – 19 मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे मानाच्या शिवछत्रपती पुरस्काराने शुभम यांचा क्रीडाविषयक कामगिरीचा राज्यस्तरीय गौरव झाला असून ‘तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार’ प्रदान होत असताना त्यांनी मांडवा जेट्टी ते एलिफंटा हे 21 किमीचे अंतर 5 तास 4 मिनीटे 5 सेकंदात, गेटवे ऑफ इंडिया ते डहाणू बीच हे 147 किमीचे अंतर 28 तास 40 मिनीटात, राजभवन भवन ते गेट वे ऑफ इंडिया हे 14 किमी चे अंतर 3 तास 13 मिनीटे 10 सेकंदात पार केल्याचा विशेष उल्लेख करण्यात आला.

आंतराष्ट्रीय ओपन वॉटर जलतरणपटू ही ओळख असणा-या शुभम वनमाळी यांनी यापूर्वी जगातील सुप्रसिध्द इंग्लिश खाडी, जिब्राल्टरची सामुद्रधुनी, कॅटनीला खाडी, मॅनहटन मॅरेथॉन स्वीम, राऊंड ट्रिर अन्जल आयलँड स्वीम, परहेन्शियन आयलँड मॅरेथॉन स्वीम अशा विविध राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय खाड्या विक्रमी वेळेत पोहून अनेक जागतिक विक्रम केलेले आहेत. त्यांच्या या यशाचे कौतुक विविध स्तरांतून झालेले असून त्यांच्या विक्रमांमुळे नवी मुंबईच्या क्रीडा विश्वाची शान वाढलेली आहे. त्यांचे मला लाट व्हायचंय हे आत्मचरित्रदेखील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे.

अनेक विक्रमांनी, पुरस्कारांनी सन्मानीत शुभम वनमाळी यांचा राष्ट्रीय स्तरावरील साहसी खेळातील सर्वोच्च मानाचा ‘तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने ऐरोली, सेक्टर 15 येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात विशेष सत्कार करण्यात आला.

महत्वाचे म्हणजे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात तृतीय क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ नवी मुंबई मिशन’ अंतर्गत शुभम वनमाळी हे ‘स्वच्छतेचे युथ आयकॉन’ आहेत.

सन 1953 मध्ये सर एडमंड हिलरी यांच्यासह सर्वौच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे तेनझिंग नोर्गे यांच्या सन्मानार्थ साहसी खेळामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणा-या साहसी खेळाडूस त्यांच्या नावाचा हा अर्जुन पुरस्काराच्या दर्जाचा हा साहसी खेळामधील राष्ट्रीय पुरस्कार (Tenzing Norgay National Adventure Award) प्रदान करण्यात येतो.         

आधुनिक शहर म्हणून नावाजली जाणारी नवी मुंबई ही सांस्कृतिक शहर व क्रीडा नगरी म्हणूनही नावाजली जावी यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून नानाविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासोबतच गुणवंत खेळाडूंना शिष्यवृत्ती दिली जात आहे. गुणवंत खेळाडूंचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित केले जात आहे. शुभम वनमाळी यांच्यासारख्या नामांकित युवा खेळांडूकडून इतर क्रीडापटूंना  प्रेरणा मिळावी व नवी मुंबई शहरात क्रीडामय वातावरण निर्मिती होऊन विविध खेळांतील दर्जेदार खेळाडू घडावेत असा नमुंमपा क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचा प्रयत्न असल्याचे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे यांनी सांगितले आहे.  

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image