श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वैज्ञानिक प्रज्ञेश म्हात्रे यांना परदेशातील शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची मदत

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वैज्ञानिक प्रज्ञेश म्हात्रे यांना परदेशातील शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची मदत 


पनवेल(प्रतिनिधी) वैज्ञानिक प्रज्ञेश लक्ष्मण म्हात्रे यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी परदेशात संधी मिळाली असून त्यांच्या भरारीला श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करून बळ दिले आहे. प्रज्ञेश म्हात्रे युनायटेड स्टेट अर्थात अमेरिकेत एअरोस्पेस इंजिनिअरिंग प्रोग्राम या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणार आहेत. 

     सदरचा धनादेश श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर  यांनी प्रज्ञेश म्हात्रे यांना आज (दि. १३) सुपूर्द केले. यावेळी प्रज्ञेश यांचे वडील लक्ष्मण म्हात्रे, अनिल पाटील, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे कार्यलयीन व्यवस्थापक अनिल कोळी उपस्थित होते. 

सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात गेल्या २५ पेक्षा जास्त वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन स्वतः च्या पायावर उभे केले जाते. प्रज्ञेश म्हात्रे यूएस मधील ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये एअरोस्पेस इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणार असून त्यांना या उच्च शिक्षणासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली तसेच पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. 


 कोट- 

मी यूएस मध्ये माझे पुढील शिक्षण घेणार आहे. सदर शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च असतो. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या संदर्भात मला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. - वैज्ञानिक प्रज्ञेश म्हात्रे

Popular posts
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image