बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालय तळोजा येथे मानवी हक्क दिन साजरा

बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालय तळोजा येथे मानवी हक्क दिन साजरा




पनवेल, दि 11- मानवी हक्क  म्हणजे भारतीय राज्य घटनेने दिलेले जगण्याचे प्रभावी साधन आहे. या हक्क दिनाला उजाळा देताना ,तळोजा येथील बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयात मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.राजेश साखरे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.व मानवी हक्कांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले


मानवी हक्क दिन म्हणजे जन्माला येणार्‍या प्रत्येकाला जे नैसर्गीक हक्क आहेत असे हक्क ज्यांच्या मूळे प्रत्येक मानवाला आपले जिवन जगणे सूकर जाते.त्यामूळे मानवी हक्क दिनाला खूप महत्व आहे.त्या मानवी हक्कांची जाणीव भावी वकिलांना व्हावी व मानवी हक्कांना उजाळा मिळावा या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब ठाकरे विधी  महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.राजेश साखरे यांनी केले होते.


यावेळी मार्गदर्शन करताना डाँ साखरे म्हणाले, तुम्ही सर्व विद्यार्थी जे भावी वकिल,विधीतज्ञ, न्यायाधीश आहात त्यांनी मानवी हक्कांचे मूल्य जाणून ,त्यांचे संवर्धन करणे गरजेच आहे. यावेळी महाविद्यालयातील  अनेक विद्यार्थ्यांनी मानवी हक्कांबाबत आपली मतं मांडली.व मानवी हक्कांचे जतन करण्यासाठी कोणती उपाययोजना करावी याबद्दल आपल्या कल्पना विषद केल्या.


........................................................................

 उरण,पनवेल ,नवी मुंबई येथील मानवी हक्काबाबत चर्चिलेले मूद्दे
 

1) यावेळी उरण,पनवेल ,नवी मुंबई येथील धूळीचे साम्राज्य हे स्वच्छ सुंदर प्रदूषण रहीत वातावरण या मानवी हक्काचे उल्ंघन

2) प्रचंड प्रमाणातील वृक्षतोड

3) वाहतूक कोंडी आणी वहानांचा धूर आणी आवाजाचे प्रदुषण

4) आर्थिक विषमता



........................................................................

मानवी हक्कांचे वर्गिकरण

1) नागरी हक्क   ,2) राजकीय हक्क ,3) आर्थिक हक्क,

3) सामाजिक हक्क, 5) सांस्कृतीक हक्क

........................................................................

मानवी हक्कां विरुद्ध हल्ला होणारे घटक

1)स्रिया , 2) मूले /मुली , 3)  अपंग ,4) आदिवाशी ,5) वृद्ध ,
6) अल्प संख्यांक,  7) मागासवर्गिय , 8) आर्थिक दुर्बल घटक
Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image