नवी मुंबई महानगरपालिका- स्वच्छताकर्मीही होत आहेत आता आपत्ती व्यवस्थापनात प्रशिक्षित

 

नवी मुंबई महानगरपालिका-

                                         

स्वच्छताकर्मीही होत आहेत आता आपत्ती व्यवस्थापनात प्रशिक्षित




      नवी मुंबई शहर स्वच्छतेमध्ये सतत मानांकन उंचावत राहिले असून यावर्षी देशात तृतीय क्रमांकाचे शहर म्हणून नावाजले गेले आहे. या मानांकनात सर्वात महत्वाचे योगदान स्वच्छताकर्मीचे असून ‘निश्चय केला नंबर पहिला’ हे आपले ध्येय साध्य करण्यासाठी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ ला सामोरे जाताना आणखी जोमाने काम करूया असे आवाहन अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी केले.

नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत आयोजित सफाईमित्रांना (फ्रंट वर्कर) आपत्तीविषयक विविध बाबींच्या प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या. याप्रसंगी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त श्रीम. मंगला माळवे, वैद्यकिय अधिकारी डॉ. कैलास गायकवाड, अग्निशमन अधिकारी श्री. पुरुषोत्तम जाधव, अग्निशमन केंद्र अधिकारी श्री. अरुण भोईर व श्री. व्हि.डी कोळी आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आपत्ती धोके प्रतिबंध विषयावर म्हणजेच आग, भूकंप, रासायनिक आपत्ती बाबात ध्वनीचित्रफितीव्दारे जनजागृती, दैनंदिन जीवनात येणा-या विविध आपत्तींवर मात करण्यासाठी मार्गदर्शन, मुले  शिक्षणापासून वंचित राहू नयेत यादृष्टीने ऑनलाईन आरटीई प्रवेश प्रणालीबाबतचे मार्गदर्शन, मातृत्व शिशू जननी सुरक्षा योजनेबाबत मार्गदर्शन अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे.

आजच्या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी बेलापूर विभागातील 17 व नेरूळ विभागातील 13 अशा 30 गटांना प्रशिक्षण देण्यात आले. अग्निशमन प्रतिबंधक करावयाच्या उपाययोजना त्याचप्रमाणे वैद्यकिय अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांनी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम तसेच शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. सुलभा बारघरे यांनी राईट टू एज्युकेशन या विषयाची माहिती दिली व उपस्थितांशी संवाद साधत त्यांचे शंकानिरसन केले. अधिक्षक श्री. रवी जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी अग्निशमन अधिकारी यांनी अग्निशमन विषयक प्रात्यक्षिकेही करून दाखविली.  उर्वरित सहा विभाग कार्यालयांतील गटांचे प्रशिक्षण दि. 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर 2022 रोजी सकाळ व दुपार अशा 2 सत्रांत विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेले आहे.

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image