सशस्त्र सेना ध्वजदिन 2022 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाचे दि.7 डिसेंबर रोजी राजस्व सभागृहात आयोजन
अलिबाग,दि.5 (जिमाका) :- जिल्ह्यातील सशस्त्र सेना ध्वजदिन 2022 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन समिती डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मान्यतेने बुधवार दि.07डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता राजस्व सभागृहामध्ये संपन्न होणार आहे.
हा कार्यक्रम जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन समिती डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील युध्द विधवा, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांना सन्मानित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे सशस्त्र सेना ध्वजदिन 2021 निधी संकलनाचे उत्कृष्ट कार्य केलेली कार्यालये, संस्था, व्यक्तींचाही प्रोत्साहनपर सन्मान करण्यात येणार आहे.
तरी माजी सैनिक, त्यांचे कुटुंबिय, नागरिक, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे.