“गरुडझेप” स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांतर्गत श्रीवर्धन येथे दोन दिवसीय पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिर संपन्न
अलिबाग, दि.29 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार “गरुडझेप” स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र - श्रीवर्धन आणि आर.क्यु.ए.सी व करियर गाईडन्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्रीवर्धन येथे दोन दिवसीय पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.
यावेळी श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी, श्रीवर्धन तहसिलदार सचिन गोसावी, पोलीस निरीक्षक संजय पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीनिवास जोशी यांनी पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना पोलीस भरती विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी श्री.शेडगे यांनी श्रीवर्धन तहसील कार्यालय येथे गरुडझेप अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या गरुडझेप ग्रंथालय व अभ्यासिका या सुविधांचा अधिकाधिक वापर करण्याचे उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.