वळवली गावात येत्या काळात अनेक विकासाची कामे होणार- माजी सभागृहनेते परेश ठाकूर

वळवली गावात येत्या काळात अनेक विकासाची कामे होणार- माजी सभागृहनेते परेश ठाकूर


पनवेल(प्रतिनिधी) वळवली गावात येत्या काळात अनेक विकासाची कामे होणार असल्याने हे गाव सुंदर आणि आदर्श गाव म्हणून ओळखले जाईल, असे मत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी रस्त्याच्या कामाच्या भुमीपूजनावेळी केले. भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे महापालिका हद्दीतील अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्यापार्श्वभुमीवर महापालिकेच्या माध्यमातून वळवली गावातील मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या विकास कामाचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी भुमीपूजन झाले.

       यावेळी माजी नगरसेवक माजी नगरसेवक हरेश केणी, महादेव मधे, माजी सरपंच शशिकांत शेळके, भाजपनेते कृष्णा चौधरी, वॉर्ड अध्यक्ष सचिन चौधरी, मारुती चिखलेकर, महिला मोर्चाच्या प्रतिभा भोईर, कृष्णा पालेकर, गोवर्धन पाटील, आनंत भोईर, विजय भगत, महेश पाटील, चंद्रकांत पाटील, हरिचंद्र पाटील, हरिचंद्र चौधरी, रुपेश म्हात्रे, कचेर भोईर, माजी उपसरपंच दिपक पाटील, जगदीश उगडा, चंद्रकांत पारधी, गुरुनाथ पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.