कॉंग्रेस भवन सभागृहात दिवंगत नेत्यांच्या प्रतिमा

 

कॉंग्रेस भवन सभागृहात दिवंगत नेत्यांच्या प्रतिमा



अलिबाग(प्रतिनिधी)-रायगड जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यापासून महेंद्रशेठ घरत हे रायगड जिल्ह्यात कॉंग्रेसचे गतवैभव प्राप्त करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी युवकमहिलाजेष्ठ कार्यकर्ते या सर्वांना सोबत घेऊन पक्ष वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर जेष्ठ नेते ज्यांनी कॉंग्रेस पक्षासाठी आयुष्य खर्च केले अशा दिवंगत नेत्यांकडून नेहमीच प्रेरणा मिळावी यासाठी दिवंगत नेत्यांच्या कॉंग्रेस पक्ष जिल्हा मुख्य कार्यालय अलिबाग येथे प्रतिमा असाव्यात अशी त्यांची मनोमन इच्छा होती. मंगळवार दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या आढावाबैठकी नंतर दिवंगत माजी आमदार माणिकराव जगतापदिवंगत माजी आमदार मधुशेठ ठाकूर तसेच दिवंगत कामगार नेते,श्याम म्हात्रे यांच्या प्रतिमा बॅरीस्टर अंतुले भवनसभागृह अलिबाग येथे लावण्यात आल्या.

           याप्रसंगी प्रदेश चिटणीस अॅड. प्रवीण ठाकूरजिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकरजिल्हा उपाध्यक्ष  राजाभाऊ ठाकूरमहिला अध्यक्षा अॅड. श्रद्धाताई ठाकूरजिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटीलमच्छीमार संघटनेचे मार्तंड नाखवा,मानवधिकार समितीच्या सौ. कविता ठाकूर,पनवेल तालुका अध्यक्ष- नंदाराज मुंगाजीखालापूर तालुका अध्यक्ष कृष्णा पारंगेपेण तालुका अध्यक्ष अशोक मोकलमाणगाव तालुका अध्यक्ष विलास सुर्वेतळा तालुका अध्यक्ष शरद भोसलेमुरुड तालुका अध्यक्ष सुभाष महाडीकसुधागड ता. अध्यक्ष बाबा कुलकर्णीअलिबाग ता. अध्यक्ष भास्कर चव्हाणमाजी तालुका अध्यक्ष योगेश मगरअॅड. के.एस. पाटील. आदी उपस्थित होते.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image