जे.एम.बक्षी व्यवस्थापनाबरोबर चर्चा करताना स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी कामगार नेते महेंद्र घरत यांनी केली

जे.एम.बक्षी व्यवस्थापनाबरोबर चर्चा करताना स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी कामगार नेते महेंद्र घरत यांनी केली

उरण(प्रतिनिधी)-रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, कामगार नेते मा. श्री.महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात उरण कॉंग्रेस रोजगार कमिटीच्या सदस्यांनी आज JNPT मध्ये नव्याने येत असलेल्या जे. एम. बक्षी व्यवस्थापनाबरोबर चर्चा करून जसखार येथील बेरोजगार मेळाव्यातील जमा केलेले स्थानिक सुशिक्षित तरुण – तरुणींचे बायोडेटा व्यवस्थापनास सुपूर्त केले. स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी कामगार नेते महेंद्र घरत यांनी यावेळी केली. तसेच स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुण -तरुणींनी आपले बायोडाटा उरण काँग्रेस रोजगार कमिटीकडे जमा करावेत असे आवाहन त्यांना केले.