भूमी अभिलेख विभागाची सरळसेवा भरती परीक्षा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात

भूमी अभिलेख विभागाची सरळसेवा भरती परीक्षा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात


अलिबाग, दि.21 (जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागातील “गट क” पदसमूह- 4 (भूकरमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता दि.9 डिसेंबर 2021 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परीक्षा नोव्हेंबर 2022 या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे.

     उमेदवारांनी दि.9 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. त्यानंतर या अर्जदारांना भूमी अभिलेख विभागाकडून दि.28 फेब्रुवारी ते दि.13 मार्च 2022 या कालावधीत छाननी अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. छाननी अर्ज प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी अपलोड केलेल्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करून भूमी अभिलेख विभागातील “गट क” पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हतेऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्र अपलोड केलेली आहेत, अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपूर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची सामान्य प्रशासन विभागाकडील दि.4 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) दि.28 नोव्हेंबर ते दि.30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

     परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांच्या प्रवेशपत्राबाबत विभागाच्या https://mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पात्र उमेदवाराने संबंधित संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन प्रवेशपत्रावर नमूद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावयाची आहे.

     परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून परिक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरिताची लिंकदेखील दि.14 नोव्हेंबर 2022 पासून विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्री.सचिन इंगळी यांनी कळविले आहे.



Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image