खारघर शहर “नो लीकर झोन" घोषित करण्याची पनवेल मनपाचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची आयुक्तांनकडे निवेदनाद्वारे मागणी

खारघर शहर “नो लीकर झोन" घोषित करण्याची पनवेल मनपाचे माजी विरोधी पक्षनेते  प्रितम म्हात्रे यांची आयुक्तांनकडे निवेदनाद्वारे मागणी


पनवेल : खारघर शहरात निरसुख पॅलेस या नव्या बार अँड रेस्टॉरंटला उत्पादन शुल्क विभागाने दारूविक्रीचा परवाना दिला आहे. तब्बल १५ वर्षांनंतर शहरात नव्याने बार अँड रेस्टॉरंट सुरू झाल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे. खारघरची ओळख ही नो लीकर झोन म्हणून आहे. या ओळखीला तडा जात असल्याने शेकापच्या शिष्टमंडळाने माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त गणेश देशमुख यांची दि. ९ रोजी भेट घेत खारघर शहराला अधिकृतरीत्या 'नो लीकर झोन'चा दर्जा देण्याची मागणी केली

      शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने पनवेल महापालिकेच्या २०१७ च्या सर्वसाधारण सभेत खारघर शहर “नो लीकर झोन” घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. खारघर शहर ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असताना खारघर शहर “नो लीकर झोन” घोषित करून ठराव प्रारीत करण्यात आला होता. ग्रामपंचायतीचे रुपांतर महापालिकेत होताच खारघर शहरात दारू विक्रीस परवानगी देण्यात येवू लागली.
        खारघर शहराची नोंद “नो लिकर झोन” म्हणून कित्येक वर्षापासून आहे. खारघर शहराला शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. शहरामध्ये कित्येक मोठ-मोठे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये अस्तित्वात आहेत. खारघर शहरात एका नव्या बार अंड रेस्टॉरंटला उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिल्याने "नो लिकर झोन" म्हणून ओळख निर्माण झालेल्या शहराच्या प्रतिमेला तडा निर्माण झाला आहे.
खारघर शहरामधून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा विरोध आणि संताप निर्माण होत आहे. खारघर शहर “नो लीकर झोन" म्हणून न घोषित केल्यास शेतकरी कामगार पक्षाकडून मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल. असे पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले आहे. याबाबतचे निवेदन आयुक्त याना देण्यात आले. यावेळी प्रीतम म्हात्रे यांच्या सोबत शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, माजी नगरसेवक डी. पी. म्हात्रे, शेकाप सह जिल्हा चिटणीस प्रभाकर कांबळे उपस्थित होते.
Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image