विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवमतदार नोंदणी जनजागृतीकरिता अलिबाग येथे दि.9 नोव्हेंबर रोजी “सायकल रॅली” व “वॉकेथॉन”चे आयोजन

 

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवमतदार नोंदणी जनजागृतीकरिता अलिबाग येथे दि.9 नोव्हेंबर रोजी “सायकल रॅली” व “वॉकेथॉन”चे आयोजन


अलिबाग, दि.07 (जिमाका):-* महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक विभागांतर्गत दि.9 नोव्हेंबर ते दि.8 डिसेंबर 2022 या कालावधीत नवमतदार नोंदणी होण्याच्या दृष्टीने “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2023” अंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे यांच्या पुढाकारातून अलिबाग येथे बुधवार, दि.9 नोव्हेंबर 2022 रोजी “सायकल रॅली” आणि “वॉकेथॉन”चे आयोजन करण्यात आले आहे.

     ही रॅली दि.9 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथून सुरु होणार असून सांगता अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर होणार आहे.

     तरी शाळा/महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी/खेळाडू यांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे व जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.


Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image