सिडकोमध्ये 31 ऑक्टोबर 2022 ते 6 नोव्हेंबर 2022 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

सिडकोमध्ये 31 ऑक्टोबर 2022 ते 6 नोव्हेंबर 2022 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन



केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशांनुसार दरवर्षीप्रमाणे सिडको महामंडळामध्ये 31 ऑक्टोबर 2022 ते 06 नोव्हेंबर 2022 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सिडको मुख्यालयासह सिडकोची नोड्ल कार्यालये, नवीन शहर कार्यालये येथे हा सप्ताह राबविण्यात येणार आहे. “भ्रष्टाचार मुक्त भारत - विकसित भारत” (Corruption free India for a developed nation) ही या वर्षीच्या दक्षता जनजागृती सप्ताहाची संकल्पना आहे. 

सिडको महामंडळामध्येही दक्षता जनजागृती सप्ताहा दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांनी 31 ऑक्टोबर 2022 रोजी सिडको भवन येथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सत्यनिष्ठेची शपथ दिली. तसेच या प्रसंगी उपस्थितांना मा. राज्यपाल आणि मा. मुख्यमंत्री यांनी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त दिलेले संदेश वाचून दाखविण्यात आले. सिडको सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास श्री. अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक, डॉ. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, डॉ. शशीकांत महावरकर, मुख्य दक्षता अधिकारी, श्री. विनोद पाटील, अध्यक्ष, सिडको एम्प्लॉईज युनियन, विभागप्रमुख व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय दक्षता आयोगातर्फे भ्रष्टाचारविरोधी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शनानुसार देशभरातील शासकीय व निमशासकीय संस्था आणि कार्यालयांमध्येही या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. अधिकारी व कर्मचारी वर्ग, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी; समाजाच्या अशा विविध स्तरांतील घटकांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जागृती निर्माण होऊन भ्रष्टाचाराचे निर्मूलन व्हावे, या उद्देशाने दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार दक्षता जनजागृती सप्ताहामध्ये विविध कार्यशाळा, निंबध स्पर्धा, भित्तीपत्रकाचे प्रदर्शनसारखे विविध जागृतीपर कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image