परिमंडळ 2 पोलीस उपायुक्तपदी पंकज डहाणे यांनी स्वीकारला पदभार ; पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वपोनि पदी अनिल पाटील यांची नियुक्ती
पनवेल (संजय कदम) ः पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई अंतर्गत आज काही वरिष्ठ अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये परिमंडळ 2 पोलीस उपायुक्तपदी पंकज डहाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी अनिल पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे.
आज करण्यात आलेल्या पोलीस खात्यातील बदल्यांमध्ये रा.रा.पोलीस बल गट क्रं.4 नागपूर येथे कार्यरत असलेले पंकज दिलीपराव डहाणे यांची नवी मुंबई आयुक्तालयातील परिमंडळ 2 या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलीस अधिक्षक फोर्स 1 महाराष्ट्र राज्य मुंबईचे तिरुपती काकडे यांची नवी मुंबई आयुक्तालयातील पोलीस उपआयुक्त वाहतूक शाखा नवी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मिरा-भाईंदर-वसई-विरार येथील अमित काळे यांची पोलीस उपायुक्त नवी मुंबई गुन्हे शाखा येथे नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मिरा-भाईंदर-वसई-विरार येथील संजयकुमार पाटील यांची नवी मुंबई पोलीस उपायुक्त विशेष शाखा येथे बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सिबीडी पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल पाटील यांची पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर यांची बदली तुर्भे पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. नेरुळ पोलीस ठाण्याचे वपोनि श्याम शिंदे यांची बदली नियंत्रण कक्ष नवी मुंबई येथे करण्यात आली आहे. तुर्भे पोलीस ठाण्याचे वपोनि राजेंद्र आव्हाड यांची दंगल नियंत्रण पथक करण्यात आली आहे. तर कोपरखैरणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांची आरबीआय या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. तसेच एपीएमसी वाहतूक शाखेचे वपोनि अतुल आहेर यांची बदली गुन्हे शाखा अ.मा.वा.प्र.कक्ष येथे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एनआरआय पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र पाटील यांची गुन्हे शाखा कक्ष 2 येथे बदली करण्यात आली आहे. रबाळे पोलीस ठाण्याचे वपोनि अजय भोसले यांची कोपरखैरणे पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुन्हे शाखा अ.मा.वा.प्र.कक्ष पराग सोनावणे यांची बदली गुन्हे शाखा येथे करण्यात आली आहे. तसेच कामोठे पोलीस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे यांची बदली एनआरआय पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. व यातील अनेक अधिकार्यांनी आज पदभार स्वीकारला आहे.