पोलीस नाईक हिंदुराव कदम यांची हवालदार पदी बढती

 पोलीस नाईक हिंदुराव कदम यांची हवालदार पदी बढती 



नवीन पनवेल : पनवेल तालुका पोलीस ठाणे येथील पोलीस नाईक हिंदुराव शिवाजीराव कदम यांना हवालदार पदी बढती मिळाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकरसहाय्यक पोलीस निरीक्षक धनश्री पवारपोलीस उपनिरीक्षक बबन सांगळे यांनी हिंदुराव कदम यांच्या खांद्यावर फित लावून त्यांचा गौरव केला.

           सन 2006 पासून हिंदुराव कदम हे पोलीस दलात कार्यरत असताना त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबईकळंबोलीवाशी या ठिकाणी पोलीस दलात कार्यरत राहून मान मिळवला आहे. दाखल गुन्ह्यांचा तपासआरोपीचा शोध व अनेक बक्षीस मिळवून पोलीस दलाची शान वाढवली. हिंदुराव कदम यांना उत्तम शेतीचे ज्ञान असून त्यांनी मूळ गावी हजार सीताफळ झाडांची लागवड करून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. हिंदुराव कदम यांच्या बढतीबाबत त्यांच्यावर मूळ गाव शिंदी खुर्द ग्रामस्थमुंबईकर परिवारमित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.