इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेल व कोमसाप नवीन पनवेल शाखेच्यावतीने नवउद्योजिकांचा पुरस्कार सन्मान सोहळा

 इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेल व कोमसाप नवीन पनवेल शाखेच्यावतीने नवउद्योजिकांचा पुरस्कार सन्मान सोहळा 


    पनवेल(प्रतिनिधी)  इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेल व कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने नवद्योजिकांचा पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित केला आहे.उद्योग - व्यवसायात समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या नवउद्योजिकांचा सत्कार नवउद्योजिकांच्या पाऊलखुणा या कार्यक्रमांतर्गत पुरस्कार देऊन केला जाणार आहे.
       शुक्रवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२२रोजी रात्रौ ८ वाजता पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हा समारंभ होणार असून या कार्यक्रमासाठी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्कप्रमुख रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील, इनरव्हील डिस्ट्रिक्ट चेअरमन (३१३) मुक्ती पानसे उपस्थित राहणार आहेत.
     या समारंभात २५ हून अधिक नवउद्योजिकांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे तसेच विशेष लक्षवेधी सत्कार केले जाणार आहेत.यानिमित्ताने मराठी व हिंदी गाण्यांची मैफली आयोजित केली आहे.        या समारंभासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या अध्यक्षा साधना धारगळकर,कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी व रंगनील नाट्य संस्थेच्या अध्यक्षा कल्पना कोठारी यांनी केले आहे.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image