अनुसूचित जातीतील नवउद्योजकांसाठी स्टॅंड अप इंडिया योजनेंतर्गत एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज योजना
अलिबाग,दि.07 (जिमाका):-* केंद्र शासनाने “स्टँडअप इंडिया” ही योजना घोषित केली आहे. या योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांतील उद्योजक लाभार्थ्यांना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2020-21 पासून योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचीत जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती घटकांतील नवउद्योजकांना 10% स्वहिस्सा भरणा केल्यानंतर बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत 75% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित Front and Subsidy 15% राज्य शासनामार्फत देण्यात येते.
या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जास्तीत जास्त नवउद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.
तसेच या योजनेच्या सविस्तर माहितीकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कच्छी भवन, नमीनाथ मंदिराजवळ, सेंट मेरी स्कूल समोरील श्रीबाग रोड, अलिबाग-402201 येथे संपर्क साधावा, असेही सहाय्यक आयुक्त श्री.जाधव यांनी कळविले आहे.