कोलवाडी येथे साठणाऱ्या पावसाच्या पाण्याची जागृती फाउंडेशन ची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
पनवेल दि २२ (प्रतिनिधी ) पनवेल तालुक्यातील पालेबुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील कोलवाडी गावातील नेसर्गिक नाले ,गटारे पाण्याचा निचरा होणारे मार्ग बंद केल्याने गावात पावसाचे पाणी वारंवार साचते ,गुडघाभर पाणी साचत असल्याने विध्यार्थी नागरिकांना या पाण्यातून मार्ग काढत जावे लागते या साठणाऱ्या पाण्याविषयी उपाययोजना करणायची मागणी जागृती फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे यांनी रायगड जिल्हाधिकारी यांचे कडे केली आहे .