सीकेटी महाविद्यालयाचे मुंबई विद्यापीठाच्या अविष्कार संशोधन स्पर्धेत देदीप्यमान यश

सीकेटी महाविद्यालयाचे मुंबई विद्यापीठाच्या अविष्कार संशोधन स्पर्धेत देदीप्यमान यश



पनवेल(प्रतिनिधी) मुंबई विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये आयोजित केलेल्या विद्यापीठस्तरीय १६ व्या अविष्कार संशोधन महोत्सवामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् ,कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेजन्यू पनवेल (स्वायत्त) ला शिक्षक दिनाच्या औचित्य साधून ओव्हरऑल रनर चॅम्पियनशिप ट्रॉफीने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.डॉ.सुहास पेडणेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.एस.के.पाटील व अविष्कार संशोधन समितीच्या अध्यक्षा डॉ. सीमा कोकितकर यांनी सन्मान स्विकारला.

         संशोधन स्पर्धेत महाविद्यालयाने ०२ सुवर्ण, ०१ कांस्य याबरोबर उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. ज्यामध्ये रसायनशास्त्र विभागाचे संशोधन विद्यार्थी अमोल पिंजरकर यांना प्रो.डॉ.बी.व्ही.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जैवतंत्रज्ञान विभागाच्या संशोधन विद्यार्थिनी राजगुरू बिंदू यांना डॉ.सीमा कोकितकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्ण पदक जिंकले. यासोबत अर्थशास्त्र विभागाचे पदव्युत्तर पदवी भाग-२ चे सुमित जोशी ने प्रो.डॉ.बी.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कांस्य पदक मिळविले. तसेच जैवतंत्रज्ञान विभागाच्या संशोधन विद्यार्थिनी रुपाली नानेकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.     

         महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.एस.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अविष्कार संशोधन समितीच्या अध्यक्षा डॉ. सीमा कोकीतकर, समितीचे सर्व सदस्य व संशोधन मार्गदर्शक यांनी स्पर्धेतील घव-घवीत यशासाठी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेतील स्पृहणीय यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगतव्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुखसचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी अविष्कार संशोधन समितीचे कौतुक केले.


Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image