सिडकोमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा

 सिडकोमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा


सिडको महामंडळाचे मुख्यालय असलेल्या सिडको भवन येथे 15 सप्टेंबर 2022 रोजी अभियंता दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे अभियंता दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त देशभर अभियंता दिन साजरा करण्यात येतो. सर एम. विश्वेश्वरैया यांनी अनेक समाजोपयोगी प्रकल्पांकरिता दिलेल्या योगदानामुळे 15 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन देशभर अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येते. 

या कार्यक्रमास श्री. अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, डॉ. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, डॉ. शशिकांत महावरकर, पोलीस उपमहानिरीक्षक तथा मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, श्री. के. एम. गोडबोले, मुख्य अभियंता (नवी मुंबई), सिडको, श्री. आर. बी. धायटकर, मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ), सिडको, श्री. एन. सी. बायस, अतिरिक्त मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प), सिडको, श्री. पी. एम. सेवतकर, अधीक्षक अभियंता (पालघर व नगर रचना-1) सिडको तथा अध्यक्ष, सिडको, सिडको, श्री. फैयाज खान, व्यवस्थापक (कार्मिक), इंजिनिअर्स असोसिएशन, श्री. विनोद पाटील, अध्यक्ष, सिडको एम्प्लॉईज युनियन यांसह सिडकोतील विभाग प्रमुख, अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात एम. विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व सिडको आर्टिस्ट कंबाईनमधील कलाकारांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. 

या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना श्री. अश्विन मुद्गल यांनी सिडकोतील अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा देत एम. विश्वेश्वरैय्या यांच्या कार्याबरोबरच त्यांनी जपलेली मुल्येही आजच्या अभियंत्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सिडकोतील अभियंत्यांनी विविध प्रकल्पांकरिता दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला.   

अभियंता दिन कार्यक्रमानिमित्त टेक्निकल पेपर व अद्वितीय कामगिरी स्पर्धांतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. टेक्निकल पेपर स्पर्धे अंतर्गत प्रथम पारितोषिक श्री. भूषण शिंदे, द्वितीय पारितोषिक श्री. विजय ढाळे, तृतीय पारितोषिक श्री. रसिक गौतम, श्रीमती स्वप्ना कदम व श्री. मनोज सूर्यवंशी यांना विभागून आणि श्री. राजीव कोलप यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले. 

अद्वितीय कामगिरी स्पर्धे अंतर्गत अधीक्षक अभियंता (गृहनिर्माण-3) यांच्या प्रधानमंत्री आवास योजना-2019 संघाला, अधीक्षक अभियंता (गृहनिर्माण-2) यांच्या प्रधानमंत्री आवास योजना-2018 संघाला, अधीक्षक अभियंता (विद्युत-नवी मुंबई) यांच्या प्रधानमंत्री आवास योजना-2018 संघाला आणि अधीक्षक अभियंता विशेष प्रकल्प) यांच्या कोविड समर्पित आरोग्य केंद्र संघाला या प्रसंगी गौरविण्यात आले. 

अभियंता दिन कार्यक्रमाची सांगता डॉ. विशाल ठोंबरे, कार्यकारी अभियंता, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी ‘रस्ते बांधणीचे आधुनिक तंत्रज्ञान’ या विषयावर केलेल्या सादरीकरणाने झाली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. प्राजक्ता साळुंखे, सहाय्यक अभियंता व श्री. गौरव हिंगणे, सहाय्यक अभियंता यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. सुरेश ठाकूर, कार्यकारी अभियंता (उलवे-1) सिडको तथा सरचिटणीस, सिडको इंजिनिअर्स असोसिएशन यांनी केले. 

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image