तुर्भे विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले

तुर्भे विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले


नवी मुंबई (प्रतिनिधी)- नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील तुर्भे विभागाअंतर्गत श्री. संतोष सावळाराम भोईर (अनधिकृत बांधकामधारक) यांनी घर क्रमांक 05 च्या मागे मोकळा भुखंड सानपाडा या ठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते. सदर अनधिकृत बांधकामास डी विभाग कार्यालय, तुर्भे यांचेमार्फत महाराष्ट्र नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. अनाधिकृत बांधकामधारकाने सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.

      सदर अनधिकृत बांधकामावर तुर्भे विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी तुर्भे विभागाकडील अधिकारी / कर्मचारीनवी मुंबई महानगरपालिका 30 मजुर, 02 पोकलन, 01 टोंईंग व्हॅन, 06 घन,  12 हातोडेतसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.

यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

 


Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image