महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रायगड जिल्हा कार्यकारणीची बैठक मोठया उत्साहात संपन्न

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रायगड जिल्हा कार्यकारणीची बैठक मोठया उत्साहात संपन्न





उरण दि ७(विठ्ठल ममताबादे )
शनिवार दिनांक ६ ऑगस्ट २०२२ रोजी  उरण तालुक्यात खोपटा येथील ओस्ट्रो हॉल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उत्तर रायगड जिल्हा कार्यकारणीची बैठक संपन्न झाली.रायगड जिल्ह्यात मनसेच्या जिल्हाध्यक्ष पदी संदेशभाई ठाकूर यांची राजसाहेबांनी नियुक्ती केल्यानंतरची ही पहिली बैठक आणि उरण तालुक्यात मनसेची गेल्या ८ ते ९ वर्षानंतरची ही बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते ह्या बैठकीस उपस्थित होते.

येणाऱ्या जिल्हापरिषद पंचायत समिती,पनवेल महानगरपालिका, तसेच उरण नगरपालिकेच्या निवडणुका ,येणाऱ्या प्रकल्पात स्थानिकांचा समावेश, खोपटा, दिघोडा ,तसेच उरण शहरात होणारी वाहतूक कोंडी समस्या,पनवेल उरण मधील खराब झालेलं रोड ह्या व इतर अनेक विषयावर चर्चा झाली. जे एन पी ए च्या जे एम बक्सि व बी एम सी टी ह्या कंपनी मध्ये होणाऱ्या भरती बाबत चर्चा तसेच  ज्या ठिकाणी आंदोलने करायला लागतील तीथे मोठ्या आंदोलनाची तयारी या विषयावर चर्चा झाली.सदर बैठक मनसे राज्य उपाध्यक्ष महेश जाधव,जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर,जिल्हा चिटणीस केसरीनाथ पाटील,उपजिल्हाध्यक्ष दीपक कांबळी,प्रवीण दळवी,महिला जिल्हाध्यक्षा आदीतीताई सोनार,पनवेल महानगर अध्यक्ष योगेश चिले, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अनिमेश ओझे , अक्षय सुतार  इतर मान्यवरांच्या व असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन  तालुका अध्यक्ष सत्यवान भगत यांनी केले.ही बैठक संपन्न होण्यासाठी उरण तालुक्याचे तालुका अध्यक्ष सत्यवान भगत यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली.
Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image