शिवसेना शिंदे गटाच्या रायगड जिल्हा प्रमुख पदी राजाभाई केणी यांची निवड

शिवसेना शिंदे गटाच्या रायगड जिल्हा प्रमुख पदी राजाभाई केणी यांची निवड


रायगडचे आमदार महेंद्र दळवी, भरतशेठ गोगावले, महेंद्र थोरवे यांच्याकडून राजाभाई केणी यांचे कौतुक व शुभेछांचा वर्षाव.

सचिन पाटील (अलिबाग)-रायगड:पक्षाशी एकनिष्ठ राहणे म्हणजे काय असते आणि एकनिष्ठ राहिल्याने कोणते परिणाम होतात याचा प्रत्यक्ष प्रत्यय राजाभाई केणी यांना नुकताच आला आहे  आणि म्हणूनच गुजरात ते गुहाटी मध्ये शिवसेना गटामध्ये झालेल्या राजकारणाच्या उलथापालथी नंतर शिवसेनेच्या कोणत्याच भूलथापांना व धमक्यांना बळी न पडता राजाभाई केणी यांनी रायगडचे आमदार मा.महेंद्र दळवी, मा.भरतशेठ गोगावले, मा.महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी खंबीरपणे एकनिष्ठेने उभे राहून पाठिंबा दिला आणि म्हणूनच या तीनही आमदारांच्या संघनमताने मा. राजाभाई केणी यांना नुकतेच शिवसेनेच्या शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख पद बहाल करण्यात आल्याची घोषणा मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या घोषणेनंतर सर्वच थरातून राजाभाई केणी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख पद हे आमदारांचे मानाचे पद आहे परंतु केवळ पक्षाशी एकनिष्ठ राहून कायम रायगडच्या आमदारांना पाठिंबा देवून खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रती असणारी एकनिष्ठा जपल्याने माझ्यावर विश्वास ठेवून मला हे मानाचे पद बहाल करून माझ्यावर जी जबाबदारी सोपविली आहे ती त्याच निष्ठेने पार पाडणार असल्याचे मत शिंदे गटाचे नवनिर्वाचित रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी व्यक्त केले. बंडखोर हे लेबल आमच्या माथी लावून त्यामागे स्वतःची पोळी भाजू पहाणारे खऱ्या अर्थाने बंडखोर असणारे फुटीरवादी विरोधकांच्या कटकारस्थानाने तालुका प्रमुख पदावरून राजाभाई केणी यांची हकालपट्टी केल्याने खुशीत असणाऱ्यांना राजाभाई केणी यांना नुकतेच बहाल करण्यात आलेल्या शिंदे गटाच्या रायगड जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती झाल्याची बातमी मिळताच विरोधकांना चांगलीच चपराक बसली आहे. शांत डोक्याने आणि संयम ठेवून ज्या पक्षाने नाव दिले त्या पक्षाशी एकनिष्ठेने राहिल्यानेच शिंदे गटाच्या रायगड जिल्हा प्रमुख पदावर काम करण्याची संधी मिळाली असल्याचे यावेळी शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई यांनी सांगितले.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image