कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या प्रयत्नाने सुरक्षा रक्षक कामावर रुजू

 कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या प्रयत्नाने सुरक्षा रक्षक कामावर रुजू



उरण दि १७-रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील कंटेनर कार्पोरेशन ऑफ इंडिया (DRT JNPT)येथील सुरक्षा रक्षक गेले ११ महिने कामापासून वंचित होते.त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी खूप शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.त्यासाठी रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष कामगार नेते  महेंद्रशेठ घरत यांचे कुशल नेतृत्व कामी आले. गरिबांचा कैवारी, गरजवंतासाठी झटणारा नेता म्हणून महेंद्र घरत सर्वपरिचित आहेत.सुरक्षा रक्षकांना सिडको सारख्या आस्थापनेत नोकरी मिळवून देण्यासाठी महेंद्र घरत यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे कामगारांना न्याय मिळाला.आज प्रत्येक सुरक्षा रक्षकांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे.त्यांच्या कुटुंबाकडून कामगार नेते महेंद्र घरत यांना आशिर्वाद दिले जात आहेत.कार्याध्यक्ष पी. के रमण, सरचिटणीस वैभव पाटील व संघटक योगेश रसाळ यांनी या कामी महत्वाची मेहनत घेतली आहे. कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या प्रयत्नाने सुरक्षा रक्षक कामावर रुजू झाल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image