श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद - युवा नेते परेश ठाकूर

श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद - युवा नेते परेश ठाकूर



पनवेल(प्रतिनिधी) श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन भाजपाचे युवा नेते,पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते  परेश ठाकूर यांनी येथे केले. सांगितले
      पनवेल शहरातील श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पनवेल महानगरपालिका हद्दीतील १० शाळांतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप पनवेल येथील श्री साईबाबा मंदिर येथे करण्यात आले त्यावेळी युवा नेते परेश ठाकूर बोलत होते. या कार्यक्रमास माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे , श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष खेमचंद गोपलाणी, सेक्रेटरी रामलाल चौधरी, उपाध्यक्ष राम थदानी उपस्थित होते.
      पुढे बोलताना परेश ठाकूर म्हणाले, सामाजिक बांधिलकी म्हणून अखंडपणे हा शैक्षणिक उपक्रम राबविला जात आहे.या शैक्षणिक साहित्यातून विद्यार्थ्यांनी मनापासून मोठं व्हावे. हा शैक्षणिक उपक्रम राबवून समाजाला सोबत घेऊन जाण्याचे काम श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्ट करत असून ही पनवेलकरांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.      
         श्री साईबाबा मंदिर पनवेल येथे पनवेल शहर, कोळेश्वर विद्या मंदिर, मोठा खांदा, धाकटा खांदा, तक्का,पोदी, गुजराती, उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी १० शाळांतील शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे या शिक्षकांना शिर्डी यात्रेचेही आयोजन श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे अशी माहिती श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी रामलाल चौधरी, उपाध्यक्ष राम थदानी यांनी दिली.
Popular posts
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई
Image