वाहतुकीचे नियम सांगत अनोखा रक्षाबंधन साजरा...

वाहतुकीचे नियम सांगत  अनोखा रक्षाबंधन साजरा...

क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनचा   रक्षाबंधन उत्साहात साजरा




पनवेल (प्रतिनिधी)-आज रक्षाबंधन दिनी नवीन पनवेल  येथे हा सन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला,,भावंडांच्या नात्यातील गोडवा अधिक वाढवणारा रक्षाबंधन हा पवित्र सण सालाबादप्रमाणे यंदाही क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या दिवशी दरवर्षी प्रमाणे वाहतूक शाखेचे  नियम न पाळणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना थांबवून त्यांना रक्षाबंधन दिनानिमित्त सुरक्षाराखी बांधून वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे असे सांगण्यात येते. भाऊ बहिणीची रक्षा करण्याचे वचन रक्षाबंधन दिवशी दिले जाते त्याचप्रमाणे आम्हा फाउंडेशनच्या महिला नियम न पाळणाऱ्या भावांना राखी बांधून त्यांचे रक्षण व्हावे, त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा अशी इच्छा व्यक्त करत हा रक्षाबंधनाचा पवित्र सण सालाबादप्रमाणे क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन सौ रुपालीताई शिंदे यांच्या मार्फत साजरा करण्यात येतो, त्याचबरोबर वाहतूक विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी हे देखील सणाच्या दिवशी सुट्टी न घेता आपले कर्तव्य बजावत असतात त्यांना देखील आम्ही फाउंडेशनच्या सर्व महिला राखी बांधून त्यांना त्यांच्या बहिणींची कमी पूर्ण करतो अश्या प्रकारे हा उपक्रम साजरा करण्यात आला ,

असा वाहतुकीचे नियमाचे पालन करण्यासाठी हा अनोखा कर्यक्रम होत आहे तसेच फाउंडेशन च्या अध्यक्ष सौ  रुपालीताई यांचे वाहतूक पोलीस निरीक्षक यांनी हा सन अभिमानास्पद साजरा करत आहात म्हणून कौतुकाची थाप देत भरभरून त्यांचे व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले,  उपस्तित  वपोनि/संजय नाळे, पोउपनिरी/गणेश खांडेकर, पोउपनिरी/जाधव, पोहवा/सुतार, मपोहवा/अलका पाटील, मपोना/वैशाली कोकाटे, मपोशि/कांचन जाधव, मपोशि/साधना पवार, मपोशि/सुप्रिया देसाई, पोशि/निकम, पोशि/आंधळे   

क्रांतीज्योत महिला विकास  फाउंडेशनच्या अध्यक्ष मा. सौ. रुपालिताई शिंदे, उपाध्यक्ष सौ. नंदिनी गुप्ता, विचुंबे अध्यक्ष सौ. रत्नमाला पाबरेकर, करंजाडे अध्यक्ष श्रीमती स्नेहा धुमाळ, आदई अध्यक्ष सौ. कुंदा धनवटे, तसेच महिला   सदस्य व पदाधिकारी उपस्थित होत्या..

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image