सहयाद्री प्रतिष्ठान तर्फे द्रोणागिरी किल्ल्यावर दुर्गसंवर्धन मोहीम.

 सहयाद्री प्रतिष्ठान तर्फे द्रोणागिरी किल्ल्यावर दुर्गसंवर्धन मोहीम.





 उरण दि. 2 (विठ्ठल ममताबादे )श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर त्यांचे विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या, गडकिल्ल्यांचे संवर्धन, संरक्षण करणाऱ्या सहयाद्री प्रतिष्ठान या संघटने तर्फे उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्यावर दुर्गसंवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहयाद्री प्रतिष्ठान उरण विभागाचे पदाधिकारी सदस्यांनी एकत्र येत द्रोणागिरी किल्ल्यावर साफ सफाई केली. विशेष म्हणजे 6 वर्षाच्या साई गोवारी या चिमुकल्याने न दमता, न घाबरता गड चढला व गडावरील प्लास्टीक  कचरा जमा केला.एकंदरीतच दुर्गसंवर्धन मोहीम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.सहयाद्री प्रतिष्ठान ही संघटना गड किल्ल्यांचे संवर्धन संरक्षण करणारी संघटना असून सहयाद्री प्रतिष्ठानने राबविलेल्या दुर्गसंवर्धन मोहिमेचे सर्वत्र कौतूक होत आहे.
Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image