प्रौढ दिव्यांगांसाठी संगणकीय व व्यावसायिक मोफत प्रशिक्षण
अलिबाग, दि.19 (जिमाका):- महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगांसाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ, मुंबईची शासन मान्यता आहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील FICCI AWARD 1999 हा प्राप्त झालेला आहे. या संस्थेत सन 2022-23 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून प्रवेशासाठी माफक जागा असल्याने इच्छुकांनी संस्थेशी त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या अधीक्षकांनी केले आहे.
*प्रवेशासाठी नियम अटी व सवलती:*
*1. अभ्यासक्रमाचे नाव, शैक्षणिक पात्रता:*
अ) सर्टिफिकेट इन कॉमप्यूटर ऑपरेशन विथ एम.एस. ऑफिस संगणक कोर्स), किमान इ.08 वी पास
ब) मोटार ॲन्ड आमेंचर रिवायडिंग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज (इलेक्ट्रिक कोर्स), किमान इ.09 वी पास
*2. वयोमर्यादा*: 16 से 40 वर्ष
*3. प्रशिक्षण कालावधी:* 1 वर्ष
*4. सोयी व सवलती:* प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्ययावत व परिपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टिकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्किंग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ञ निदेशक, उज्वल यशाची परंपरा, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी, व्यवसायासाठी बीज भांडवल योजना.
5. फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो.
*अर्ज केव्हा, कसे व कोठे करावेत:*
प्रवेश अर्ज व माहिती पत्रक अधीक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज, ता.मिरज, जि.सांगली, पिन कोड:- 416410, दूरध्वनी- 0233-2222908 मोबाईल- 9922577561/ 9975375557 या पत्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत मिळतील.
प्रवेशासाठी कोणती ही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन फोटोसह संस्थेकडे पाठवावा किंवा समक्ष भरून द्यावेत, प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांग असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे दि.31 जुलै 2022 पूर्वी पोहचतील, अशा बेताने पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ञ समितीद्वारे मुलाखती घेवून प्रवेश देण्यात येईल.
तरी प्रौढ दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या या संस्थेत माफक जागा असल्याने गरजू दिव्यांगांनी या सूवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी त्वरीत संस्थेशी संपर्क साधावा तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास ज्ञात असलेल्या गरजू दिव्यांग बांधवांना या शासकीय योजनेची माहिती करून द्यावी, असे आवाहन शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृहाच्या अधीक्षकांनी केले आहे.