प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उदघाटन
पनवेल : जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल व केअर ऑफ नेचर सामाजिक संख्या वेश्वी- उरण यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित केलेल्या उरण तालुक्यातील वेश्वी येथे विविध विकास कामांचे उदघाटन पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते झाले. प्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून पूजन करण्यात आले.तदनंतर पाहुण्यांचा सरकार समारंभ पार पडला. त्यानंतर वेश्वि व जांभूळपाडा गावातील लोकांना ई श्रम कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी पाहुण्यांचे मनोगत झाले.युवा नेते प्रीतम मुंबईकर, महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर, महेंद्र मुंबईकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.आम्हीं वेश्विकर नावाचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.स्वर्गीय गंगाबाई पदाजी मुंबईकर यांच्या नावाने गणेश घाटाचे लोकार्पण,रॉक अनिमल पार्कचे लोकार्पण,वृक्षारोपण आदी विविध विकासकामांचे उदघाटन युवा नेते प्रीतम म्हात्रे यांनी केले.