प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी आपले बॅंक खाते ई-केवायसी करून घेणे बंधनकारक-तहसिलदार मीनल दळवी

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी आपले बॅंक खाते ई-केवायसी करून घेणे बंधनकारक-तहसिलदार मीनल दळवी


अलिबाग, दि.28 (जिमाका):- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी आपले खाते ई-केवायसी तसेच एन.पी.सी.आय. (संबंधित बँकेमध्ये जावून बँक खात्याशी आधार लिंक करणे) या विषयाबाबत तहसिलदार कार्यालय अलिबाग येथे दि.26 जुलै 2022 रोजी गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी अलिबाग, अलिबाग तालुक्यातील कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी कृषी, /शेती यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.

     या बैठकीमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना ई-केवायसी तसेच एन.पी.सी.आय (संबंधित बँकेमध्ये जावून बँक खात्याशी आधार लिंक करणे) बाबतच्या सूचना देण्यात आल्या.

     अलिबाग तालुक्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी या योजनेच्या लाभासाठी आपल्या लाभाचा हप्ता जमा होणारे बँक खाते ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी त्यांचे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेकरिता असलेले बँक खाते ई-केवायसी करण्याकरिता आपल्या आधारकार्डसाठी रजिस्टर केलेल्या मोबाईलसह, आधारकार्ड व बँक पासबुक घेवून नजिकच्या आधारकार्ड सुविधा केंद्र/ ई-सुविधा केंद्र/महा ई-सेवा केंद्र/ संबंधित बँक या ठिकाणी आपल्या खात्याची ई-केवायसी दि.31 जुलै 2022 पूर्वी करून घ्यावी.

     लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या गावच्या तलाठी/ ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी/ कृषी सहाय्यक/ कृषीसेवक यांच्याशी संपर्क साधावा. लाभार्थ्यांनी या योजनेचे लाभ ऑगस्ट 2022 महिन्यापासून पुढे चालू राहण्याकरिता आपले बँक खाते दि.31 जुलै 2022 पूर्वी ई-केवायसी (E-KYC) करणे आवश्यक आहे, असे अलिबाग तहसिलदार मीनल दळवी यांनी कळविले आहे.


Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image