रोडसाइड असिस्टन्सच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ऑटो आय केअरचे ईव्ही क्षेत्रात पदार्पण
मुंबई, १८ जुलै २०२२ : ईलेक्ट्रिक वाहने नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास टाळत असल्यामुळे आणि त्यांच्या पर्यावरणस्नेही गुणधर्मामुळे भारतात हळुहळू आणि निश्चितपणे स्वीकारली जाऊ लागली आहेत. २०३० पर्यंत भारताला ईव्ही सुपरपॉवर करण्याच्या भारत सरकारच्या घोषणेला पाठिंबा देणाऱ्या कंपन्यांसह, ऑटो आय केअर या भारतातील प्रीमिअर रोडसाइड असिस्टन्स कंपनीतर्फे ईव्ही उत्पादनाच्या नव्या व्यवसायक्षेत्रात पदापर्ण करण्यात येणार आहे. देशभरात विस्तारीकरण करण्याचा एक भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. या आर्थिक वर्षात ऑटो आय केअर ईव्ही दुचाकी लाँच करणार आहेत आणि येत्या सणासुदीच्या हंगामामध्ये ही दुचाकी बाजारात येणार आहे आणि विविध प्रकारच्या आवडीनिवडी असलेल्या ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करेल.
देशभरात रोडसाइड असिस्टन्स क्षेत्रात अविरतपणे अनेक वर्षे काम केल्यानंतर आणि २३८ महामार्गांवर २,२८,००० किलोमीटर अंतरावर ५५,०००+ गॅरेज व मेकॅनिक्सचे भक्कम नेटवर्क उभारल्यानंतर आणि ११०० हून अधिक शहरे व नगरांपर्यंत पोहोचल्यानंतर या अत्यंत स्पर्धात्मक क्षेत्राचा भाग होण्यास ऑटो आय केअर सज्ज झाली आहे. ऑटो आय केअर इनोव्हेशन प्रा. लि.चे संस्थापक सागर जोशी म्हणाले, “गॅरेजच्या सध्याच्या विद्यमान, भक्कम नेटवर्कसह भारतातील प्रीमीअर रोडसाइड असिस्टन्स कंपनी प्रस्थापित केल्यानंतर ईव्ही ब्रँड सादर करणे हे आमचे साहजिक पुढचे पाऊल होते. आम्ही आमच्या प्रमुख व्यवसायापासून लक्ष विचलित करत नसून आमच्या रोडसाइड असिस्टन्ससंदर्भातील ज्ञानाचा उपयोग करून ईव्ही क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या मूलभूत पातळीवर जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी काम करू शकू. २०३० पर्यंत ईव्ही सज्ज होण्याच्या भारत सरकारच्या पुढाकाराला आमचा पाठिंबा आहे. आम्ही लवकरच आमची ईव्ही सर्व्हिस सेंटर सुरू करू, प्रगत ईव्ही चार्जिंग नेटवर्क इत्यादी सुविधा विकसित करू आणि भारतातील ईव्ही वाहनांसाठी उपयुक्त असेल.”
ऑटो आय केअरची तंत्रज्ञान भागीदारांशी सहयोग करण्याची योजना आहे आणि त्यांचा निर्मिती कारखाना उभारण्यासाठी व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खासगी गुंतवणूक/एंजल गुंतवणूकदारांना पाचारण करत आहेत. यामुळे अधिक रोजगारसंधी निर्माण होतील आणि मेक इन इंडियाचा प्रसार होईल. यामुळे पायाभूत सुविधा व तंत्रज्ञान समाविष्ट होईल, ज्यामुळे शाश्वत व पर्यावरणस्नेही ईव्ही ब्रँड तयार होण्यास मदत होईल.
“आम्हाला ऑटो आय केअर अॅपवर दररोज देशभरातून ३५०० कॉल येतात आणि त्यापैकी समस्यांचे निराकरण करू इच्छिणारे कॉल दक्षिण झोनमधून सर्वाधिक असतात. त्याखालोखाल अनुक्रमे पश्चिम व उत्तर झोनमधून क़ल येतात.”, अशी पुष्टी त्यांनी जोडली. या बूटस्ट्रॅप्ड बिझनेसने (वैयक्तिक स्रोतांमधून उभे केलेल्या सुरुवातीच्या भांडवलाने सुरू केलेला व्यवसाय) विस्तारीकरणासाठी व वन स्टॉप रोडसाइड असिस्टन्स सोल्यूशनसह भारतीय बाजारपेठेत अधिक खोलवर पोहोचण्यासाठी आणि कंपनीच्या विविधीकरण योजनांसाठी निधी उभारला आहे (याची आकडेवारी जाहीर केलेली नाही).
ऑटोमोबाइल इंजिनीअर असलेल्या सागर जोशी यांनी २०१५ मध्ये ऑटो आय केअरची स्थापना केली. ऑटो आय केअर प्रवाशांना २० मिनिटांच्या आत सहाय्य प्रदान करण्यासाठी असंघटित रोड साइड असिस्टन्स मार्केट एका छत्राखाली आणत आहे. ऑटो आय केअरची दर १० किमीच्या अंतरावर २ संलग्न गॅरेज आहेत. त्यामुळे ते प्रवाशांना लवकरात लवकर मदत प्रदान करू शकतात. ग्राहकांना आपल्या नियोजित सर्व्हिसिंगसाठी तसेच अचानक उद्भवलेल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी मदत करते. नव्या अपग्रेडसह आता कंपनी सर्व्हिस सेंटर, ऑथोराइझ्ड सर्व्हिस सेंटर, मल्टि-कार सर्व्हिस सेंटर, देशात कुठेही जवळपास असलेली गॅरेज यांची निवड ग्राहकांना करता येऊ शकते. वेबसाइट : www.autoicare.in
*Media Queries: Shraddha 9869100555 Aishwarya 8828936449 ashwinipublicity@gmail.com*