श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलमध्ये अवघ्या १० दिवसांच्या अर्भकाच्या हृदयाच्या छिद्राची शस्त्रक्रिया यशस्वी-अॕड.नरेश ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश

श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलमध्ये अवघ्या १० दिवसांच्या अर्भकाच्या हृदयाच्या छिद्राची शस्त्रक्रिया यशस्वी-अॕड.नरेश ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश


पनवेल दि . १४(वार्ताहर): दहा दिवसाच्या अर्भकाच्या हृदयाच्या छिद्राची शस्त्रक्रिया खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या महेनतीमुळे व 

पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती ऍडव्होकेट नरेश ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे यशस्वी झाली आहे.  

      तटकरे दांपत्याला  मुंबई येथील  के ई एम हॉस्पिटल मध्ये मुलगी झाली. मात्र त्या बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे डॉक्टरांना १० दिवसानंतर निदर्शनास आले.  त्यामुळे हृदयाची शस्त्रक्रिया करणे तातडीन गरजेची होती. मात्र त्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करणे अवघड होत असल्यामुळे बाळाचे आई-वडील मोठ्या संकटात पडले होते. यावेळी त्यांचे खारघर सेक्टर 10 मोनार्क सोसायटी मध्ये राहणारे मित्र अमेय भांगळे यांच्या आईने नरेश ठाकूर यांना फोन करून या संदर्भातील माहिती दिली व त्यांना तातडीने मदत हवी आहे असे सांगितले. व त्या बाळाला खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल येथे ऍडमिट करून तातडीने शस्त्रक्रिया केली तर तिचा प्राण वाचेल अशी माहिती दिली. हे समजताच नरेश ठाकूर यांनी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधला व याबाबतची सर्व माहिती देऊन तातडीने शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली. त्यानुसार सदर बाळाला  के ई एम हॉस्पिटल येथून तातडीने श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल खारघर येथे हलवण्यात आले व उपस्थित डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून सदर शस्त्रक्रिया यशस्वी केली. ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. आज 20 दिवसानंतर या बाळाला हॉस्पिटल मधून सुखरूप डिस्चार्ज केल्याने या बाळाच्या आई-वडिलांनी आनंद व्यक्त केला असून, श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलसह माजी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्या आभार मानले आहेत. 

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image