श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्या वाटपाचा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्या वाटपाचा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली


पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पक्ष उलवे नोड 1 व 2 आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्या वाटपाचा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली. या अंतर्गत  

पनवेल तालुक्यातील शेलघर, बामणडोंगरी, बेलपाडा, जावळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मोफत वह्यांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

           सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब व गरजूंना नेहमीच मदतीचा हात देणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येते. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.यावेळी शेलघर अध्यक्ष अमृत भगत, तालुका चिटणीस जयवंत देशमुख, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, सुहास भगत, अनिल कोळी, श्रीधर भगत, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रल्हाद भगत, अजय भगत, रमेश घरत, राजू भगत, प्रभाकर भगत, माजी सदस्या इंदूताई पाटील, अशोक घरत, सतिश म्हात्रे, संतोष म्हात्रे, बेलपाडा अध्यक्ष गणेश पाटील, द. जा. कोळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश पाटील, उपाध्यक्ष अतिश पाटील, अशोक कोळी, निशा कोळी, प्रणाली ठाकूर, कविता म्हात्रे, अश्विनी कोळी, अंकुश ठाकूर, साजन भोईर, वहाळ ग्रामपंचायतीच्या सदस्या गिता ठाकूर, मनोज नाईक,  बामणडोंगरी गाव अध्यक्ष नंदकुमार ठाकूर, दीपक गोंधळी, पदाजी नाईक, निलेश खोत, चिटणीस रवी शिंदे, उलवड नोड 1 अध्यक्ष मदन पाटील, रामदास नाईक, मनोज नाईक, सुवर्णा ठाकूर, समाधान पाटील, निलेश म्हात्रे, अलंकार म्हात्रे, सांस्कृतीक सेल अध्यक्ष नान गडकरी, प्रसाद घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात शेलघर येथील शाळेत 107, बेलपाडा येथील शाळेत 364, बामणडोंगरी येथील शाळेत 1133 तर जावळे येथील शाळेत 132 वह्यांचे वाटप करण्यात आले.

Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image