गंध सुरांचा संगीत अकॅडमी मध्ये गुरुपौर्णिमा साजरी
पनवेल :नामवंत गायक गणेश भगत यांच्या गंध सुरांचा संगीत अकॅडमी मधिल विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा साजरी केली.
गुरुपौर्णिमेच्या निमित्त संगीत अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी गंध सुरांचा संगीत अकादमीचे गुरुवर्य व प्रसिद्ध गायक गणेश भगत, शिक्षिका वर्षा लोकरे, शिक्षक प्रवीण भोपी, अभिषेक नांदगावकर, चंद्रशेखर भोपी, हनूमान पाटील, राजु भोईर यांना शाल, गुलाब पुष्प व भेट वस्तू देऊन गुरु पौर्णिमा साजरी केली.
या प्रसंगी उद्योजक भास्कर अंबो फुलवरे, आरटीओचे अधिकारी दीपक उगले तसेच पालक मोठ्या संखेने या कार्यक्रमात सहभागी होते.