हास्य कलाकार स्व.कमलाकर वैशपांयन यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना आदरांजली

हास्य कलाकार स्व.कमलाकर वैशपांयन यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना आदरांजली


पनवेल : आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत नाट्यगृह येथे हास्य कलाकार स्व.कमलाकर वैशपांयन यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. तसेच जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने जेष्ठ हास्य कलाकार, हास्य दरबार फेमदिलीप खन्ना, हास्य सम्राट जॉनी रावत, जादूगार श्री.बबन कुमार, निवेदक श्री.परेश दाभोलकर, इट बिट्सचे निर्माते श्री.कमलाकर बनसोडे, स्टँडअप कॉमेडियन श्री.डी. महेश, वादक श्री.अजय मातोंडकर, मिमिक्री आर्टिस्ट श्री.गुरू कदम, गायक डॉ.गव्हाते सर, खानदेशी कॉमेडियन श्री.विजय शिरसाट या कलाकारांना मानचिन्ह देऊन त्यांचे सत्कार केले. यावेळी वादक श्री.अजय मातोंडकर यांनी दिवंगत हास्य कलाकार कमलाकर वैशपांयन यांना आपल्या वादनाच्या शैलीत आदरांजली वाहिली.

        या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह सह मा.महापौर डॉ.कविता चौतमोल, मा.सभागृह नेते परेश ठाकूर, साई संस्थान वहाळचे अध्यक्ष श्री.रवींद्र पाटील, पनवेल अर्बन बँक संचालिका श्रीमती.माधुरी गोसावी, मा.उपमहापौर सौ.सिताताई पाटील, मा.नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, मा.नगरसेविका सौ.प्रीती जॉर्ज, मा.नगरसेविका सौ.दर्शना भोईर तसेच हास्य कलाकार उपस्थित होते.


Popular posts
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई
Image