रेल्वे लाईट हाऊस च्या गटारामध्ये आढळला मृतदेह
पनवेल दि . ०३ ( संजय कदम ) : पनवेल रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ०१ पासून सुमारे ५० ते ६० मीटर अंतरावर रेल्वे लाईट हाऊस च्या गटारामध्ये एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे .
सदर इसमाचे अंदाजे वय २० ते २५ वर्ष , उंची ५ फूट , रंग सावळा , अंगाने सरपातळ , डोक्याचे केस बारीक , दाढी खुरटी आहे, या इसमा बाबत कोणाला अधिक माहित असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे , फोन - ०२२-२७४५२३३३ किंवा सपोनि अनिल देवळे यांच्याशी संपर्क साधावा,