स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांना वेठीस धरू नका:- प्रितम म्हात्रे
विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांचा महानगरपालिका अधिकारी, महावितरण अधिकारी, कंत्राटदार यांच्यासोबत कामोठे संयुक्त दौरा
नवीन पनवेल : पनवेल महानगरपालिका अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर आणि महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यासोबत विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत कामोठे शहरातील नागरी समस्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सेक्टर ५,६,७,८,९,१०,११,१२ येथील ड्रेनेज लाईनची साफसफाई झालेली नसून पाणी रस्त्यावरून वाहत आहे, तसेच ज्या सेक्टर मध्ये जसे की सेक्टर ३६,३५,३४,१८,१९,२०,२१ कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी सांगताहेत की नाले सफाई झाली आहे तेथेही पाहणी केली असता फक्त नाल्याच्या झाकणाखालील माती काढण्यात आली आहे असे निदर्शनास आले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दोन्ही चेंबरमध्ये माती तशीच असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही असे निदर्शनास आणून दिले. गटार साफसफाईच्या बाबत विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे पोलखोल केली.
रस्त्यांवर साचलेला पाण्यासंदर्भात ठिकठिकाणी सेवेरेज लाईन ओव्हरफ्लो होऊन मलमूत्र रस्तावर येत असल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी महावितरण विभागाच्या DP आणि केबल्स उघड्या अवस्थेत आहेत. या ठिकाणी पावसात शॉर्ट सर्किटमुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे याची गंभीर दखल घेत सर्व कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना कामाच्या पूर्तता करण्याच्या सूचना विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी केल्या. त्यावेळी महानगरपालिका अधिकारी आणि महाराष्ट्र विद्युत अधिकारी यांनी एका आठवड्यात कामाची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आणि तसा रिपोर्टही सादर करू असे सांगितले.
वरील सर्व समस्यांचा पाहणी दौरा करत असताना सोबत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस नगरसेवक गणेश कडू, नगरसेवक सखाराम म्हात्रे, माजी नगरसेवक शंकर म्हात्रे, मा. नगरसेवक प्रमोद भगत, कार्याध्यक्ष गौरव पोरवाल, व्यापारी संघटना अध्यक्ष सुरेश खरात, प्रमुख शहर संघटक अल्पेश माने, महिला अध्यक्षा उषा झणझणे, लाल ब्रिगेड अध्यक्ष. कुणाल भेंडे, महिला कार्याध्यक्ष शुभांगी खरात, उपाध्यक्ष रमेश गोरे, उपाध्यक्ष विश्वास भगत, व्यापारी संघटना उपाध्यक्ष नाना भगत,. गणेश मुळीक आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते