साथरोगाला आळा बसण्याच्या दृष्टीने नागरिकांनी पाण्याची जैविक तपासणी करून घ्यावी-जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

 

साथरोगाला आळा बसण्याच्या दृष्टीने नागरिकांनी पाण्याची जैविक तपासणी करून घ्यावी-जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

 


     अलिबाग, दि.14 (जिमाका):-जून ते सप्टेंबर या कालावधीत पाण्याची जैविक तपासणी करणे गरजेचे आहे. पाण्याची जैविक तपासणी साथरोगाला आळा बसण्याच्या (जसे काविळ, अतिसार, कॉलरा इ.) दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. तरी नागरिकांनी प्रयोगशाळेतून पाण्याची गुणवत्ता तपासून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री.हनुमंत संगनोर यांनी केले आहे.

     रायगड जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या कार्यालयाच्या अंतर्गत 06 पाणी तपासणी प्रयोगशाळा (01 जिल्हा व 05 उपविभागीय प्रयोगशाळा) कार्यरत आहेत. जिल्हा प्रयोगशाळा ही अलिबाग तालुक्यात व पेण, महाड, माणगाव, कर्जत, रोहा तालुक्यात अशा एकूण 05 उपविभागीय प्रयोगशाळा कार्यरत आहेत. तसेच आरोग्य विभागांतर्गत 01 जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा ही अलिबाग तालुक्यात कार्यरत आहे.

     या प्रयोगशाळांमार्फत सार्वजनिक तसेच खाजगी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची जैविक व रासायनिक तपासणी करुन पाण्याची गुणवत्ता तपासली जाते. या प्रयोगशाळांचे सनियंत्रण उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग, रायगड जिल्हा परिषद यांच्यामार्फत केले जाते.

     तरी नागरिकांनी प्रयोगशाळेतून पाण्याची गुणवत्ता तपासून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री.हनुमंत संगनोर यांनी केले आहे.


Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image